‘माझी शाळा-माझे शिक्षक’; शिक्षक दिनानिमित्त ‘कोमसाप-मालवण’ शाखा लेखमालेतून जागविणार स्मृती

मालवण : पाच सप्टेंबर रोजी असलेल्या शिक्षक दिनानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यात विविध स्थानिक लेखक आपल्याला घडविणाऱ्या शाळेच्या आणि शिक्षकांच्या स्मृती जागवणारे लेख लिहिणार आहेत. ही लेखमाला पाच सप्टेंबरपासून २० दिवस चालणार असून, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते नुकतेच या उपक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन झाले.