एकसष्टाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर सुरू असलेल्या प्राथमिक फेरीत आज (१० डिसेंबर २०२२) रात्र संपली, पण उजाडलं कुठं? हे नाटक रत्नागिरीतील आश्रय सेवा संस्था सादर करणार आहे. पुरुषपात्रविरहित या नाटकात वैभवसंपन्न एका सच्छील गृहिणीची आणि पुत्रप्राप्तीनंतर तिला वेड लागल्याने संसाराची विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या बहिणीची ही कथा आहे.