तीन फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये ऋग्वेद संहिता स्वाहाकार; फडकेशास्त्रींच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांकडून आयोजन

तीन फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चिपळूणमधील श्री. फडके गुरुजी पुरोहित मंडळाने ऋग्वेद संहिता स्वाहाकाराचे आयोजन केले आहे. दिवंगत वेदमूर्ती दिनकरशास्त्री जनार्दन फडके यांच्या स्मरणार्थ त्यांच्या विद्यार्थ्यांनी हा स्वाहाकाराचा कार्यक्रम ठरवला आहे.

श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात भक्तिभावाने पार पडला ऋग्वेद संहिता स्वाहाकार

मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) : येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात अधिक श्रावण मासानिमित्ताने ३० जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ऋग्वेद संहिता स्वाहाकार मोठ्या भक्तिभावाने पार पडला. वायंगणी (ता. कणकवली, सिंधुदुर्ग) येथील वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वाहाकार झाला. स्वाहाकारासाठी पुण्यातील घनपाठी वेदमूर्ती गोपाळ जोशीही उपस्थित होते. ऋग्वेदातील १० हजार ५०० मंत्रांचे हवन या सप्ताहात झाले.