सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर रुजतोय नव्या आशेचा अंकुर

जैवविविधता कमी होतेय; डोंगर उघडेबोडके होताहेत; वानरं-माकडं, हत्तींपासून बिबट्यांपर्यंत अनेक वन्यजीव मानवी वस्तीत येताहेत अशी परिस्थिती कमी-अधिक फरकाने सगळीकडेच अनुभवायला मिळते आहे. त्यावर कोणते उपाय करता येतील, याबद्दल चर्चा झडत आहेत. नियतकालिकांची पानं आणि वेबसाइट्सची पेजेस याबद्दलच्या माहितीने भरभरून वाहत आहेत. ती परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे हात मात्र तुलनेने फारच थोडे आहेत. या मोजक्या हातांमध्ये समावेश होतो तो सावंतवाडीतले (जि. सिंधुदुर्ग) अँड्र्यू फर्नांडिस आणि त्यांचे दोन मुलगे डॅनियल आणि फ्रँकलीन यांचा.

Continue reading

कोकणातील ३६५ जंगली वनस्पतींची ओळख करून देणार जैवविविधता दिनदर्शिका; जागरूकतेसाठी तरुणाचा उपक्रम

पर्यावरणाविषयी सजग असलेल्या कोकणातल्या एका तरुणाच्या पुढाकारामुळे कोकणातली जैवविविधता कॅलेंडरवर पाहायला मिळणार आहे. अणसुरे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) इथल्या हर्षद तुळपुळे या तरुणाने २०२२ ची जैवविविधता दिनदर्शिका तयार केली आहे.

Continue reading