गीता जयंतीनिमित्त रत्नागिरीत संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता पारायण; १२५ जणांचा सहभाग

रत्नागिरी : गीता जयंतीनिमित्त रत्नागिरीतील गीता भवनात आज (२२ डिसेंबर) सकाळी चार तास संपूर्ण श्रीमद्भगवद्गीतेचे पारायण करण्यात आले. या पारायणात १२५हून अधिक महिला, पुरुष, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. गीता मंडळ, नारायणी पठण मंडळ, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, स्वानंद पठण मंडळ, कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र आणि संस्कृत भारती या सहा संस्थांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Continue reading

गीता जयंतीनिमित्त गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात गीताव्रतींचा सन्मान

रत्नागिरी : ‘गीतेचे केवळ पाठांतर न करता त्यातील तत्त्वज्ञान आपलेसे करण्यासाठी गीताव्रती प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्य व्यक्तीनेही गीतेतील तत्त्वज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करावेत. सुख-दुःखामध्ये गुरफटून न जाता या दोन्ही बाबतीत साम्यावस्था आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,’ असे प्रतिपादन निवृत्त प्राध्यापिका डॉ. नीला जोशी यांनी केले.

Continue reading