गोळपच्या हरिहरेश्वर मंदिरातला वैशिष्ट्यपूर्ण कार्तिकोत्सव

रत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. टिपर्‍या, पट्टे अशा खेळांसह या मंदिरात होणारा कार्तिकोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्या उत्सवाविषयी अविनाश काळे यांनी लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.

शालेय विद्यार्थ्यांपर्यंत महती पोहोचवून राणी लक्ष्मीबाईंना अभिवादन

रत्नागिरी : शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत महती पोहोचवून रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाने झाशीची राणी लक्ष्मीबाईंना जयंतीनिमित्ताने अभिवादन केले.