रत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. टिपर्या, पट्टे अशा खेळांसह या मंदिरात होणारा कार्तिकोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्या उत्सवाविषयी अविनाश काळे यांनी लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.
…..
आमचं गाव म्हणजे रत्नागिरी तालुक्यातलं गोळप! फार पूर्वी गावात अनेक घनपाठी ब्राह्मण वेदमूर्ती राहत असल्याने गोळपला प्रतिकाशी असं म्हटलं जात असे. गावात पूर्वी दोन वेदपाठशाळा होत्या. सुमारे २८ वाड्यांचं पाच हजार लोकवस्तीचं गाव. श्री रवळनाथ हे ग्रामदैवत! याचा उत्सव शिमग्यात म्हणजे होळीला होतो. दुसरं मंदिर सत्येश्वराचं. याचा उत्सव शिवरात्रीला होतो. तिसरं मंदिर म्हणजे श्री हरिहरेश्वर म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश! ब्रह्मा, विष्णू, महेश अशा तीन मूर्ती असलेलं मंदिर दुर्मीळ आहे. या मूर्तींच्या चेहर्यावरचे भाव प्रचंड सात्त्विक आहेत. या मूर्ती साधारण तीनशे वर्षांपूर्वी काशीहून आणल्या गेल्या असं ऐकिवात आहे.

मंदिराच्या आवारात सहसा कुठे न आढळणारं वैनतेय म्हणजे गरुडाचं मंदिर आहे. मंदिराला प्रशस्त पोवळी म्हणजे खाली आणि सभोवती पूर्वीच्या विशिष्ट मोठ्या चिर्यांचं कलात्मक आणि रेखीव असं अप्रतिम बांधकाम आहे. या हरिहरेश्वर मंदिरात कार्तिकोत्सव होतो. देऊळ फार प्राचीन असलं, तरी देवळातल्या अखंडित उत्सवाचं यंदाचं (२०२२) १३३वं वर्ष आहे. कोरोनाची दोन वर्षं सोडली तर उत्सवातली नाटक परंपराही १३३ वर्षं अखंडितपणे सुरू आहे. कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत हा उत्सव होतो.
संपूर्ण लेख वाचा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात… (अंक घरपोच मागवण्यासंदर्भात, तसेच अंकाच्या अंतरंगासंदर्भात माहिती पुढे दिली आहे.)
स्पर्धेतले विजेते लेख, अन्य लेख, चित्रं आदी साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात आलं आहे. या अंकात पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतल्या वेगवेगळ्या दैवतांच्या उत्सवांबद्दलच्या एकूण ३४ सुंदर लेखांचा खजिना आहे. त्याशिवाय कथा, कविता, व्यंगचित्रं आदी फराळही आहेच. एकंदरीतच हा अंक संग्राह्य आणि कोकणाबद्दलच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. या अंकातून वाचनानंद तर मिळेलच; पण पर्यटकांना वेगवेगळ्या मंदिरांची माहितीही मिळू शकेल.
पृष्ठसंख्या : १००
मूल्य : १५० रुपये
9850880119 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपलं नाव व संपूर्ण पत्ता कळवल्यास अंक घरपोच पाठवला जाईल.
मुंबई, पुणे, रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली, लांजा येथील प्रमुख वितरकांकडे अंक उपलब्ध.
ई-बुक खरेदीसाठी लिंक :
गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ
मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536
बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78 (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
अक्षरधारा – https://akshardhara.com/38761-diwali-ank.html (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
पायल बुक्स – https://bit.ly/3VTmRyl (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)


विजेत्यांची चित्रे पाहण्यासाठी, तसेच अंकाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा स्लाइडशो आणि व्हिडिओ…

