रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवरूखजवळच्या निगुडवाडीत पूर्वीच्या काळी गावकरी एकत्र येऊन गावात कोणतीही रोगराई येऊ नये यासाठी ग्रामदेवतांकडे आराधना करीत, प्रार्थना करीत, विनंती करीत. ती आराधना पद्धत आजही सुरू असून, या आगळ्यावेगळ्या परंपरेबद्दल शांताराम गोरुले यांनी लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला. त्या लेखाची ही एक छोटी झलक.
…..
निगुडवाडी या गावची कोण्या पुरुषांनी स्थापना केली आणि या गावात कित्येक पिढ्या होऊन गेल्या. आताची पिढी कितवी हे सांगणं कठीणच! या गावाला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभला आहे. महिमतगड ही भव्य वास्तू आजही त्याची साक्ष देते आणि यापुढेही कित्येक पिढ्या देईल. एकूणच पाहता किमान ४०० वर्षांचा इतिहास निगुडवाडी गावाला आहे. गावरहाटी चालवताना इतकी वर्षे त्या त्या पिढीतील आणि त्या त्या वेळी गावातील मान्यवरांनी ग्रामदेवतांच्या स्थापनेपासून वार्षिक सणवार निश्चित केले. तेच सणवार गाववासीय आजतागायत परंपरेनुसार आनंदाने साजरे करीत आहेत.

गाव म्हणजेच एक कुटुंब ही संकल्पना त्या वेळी रूढ होती. आजही ती अबाधित आहे. अशा रोगराईच्या वेळी गावकरी एकत्र येऊन गावात कोणतीही रोगराई येऊ नये यासाठी ग्रामदेवतांकडे आराधना करीत, प्रार्थना करीत, विनंती करीत. ‘देवतांनो गावात कोणतीही रोगराई येऊ देऊ नका. गाव सुखी ठेवा. आम्ही सगळा गाव तुमची मनोभावे आराधना करीत आहोत. आमची हाक ऐका!’ कित्येक वर्षांपूर्वी वाडवडिलांनी सुरू केलेली ही ‘आराधना’ पद्धत आजही निगुडवाडी गावात सुरू आहे.
संपूर्ण लेख वाचा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात… (अंक घरपोच मागवण्यासंदर्भात, तसेच अंकाच्या अंतरंगासंदर्भात माहिती पुढे दिली आहे.)
स्पर्धेतले विजेते लेख, अन्य लेख, चित्रं आदी साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात आलं आहे. या अंकात पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतल्या वेगवेगळ्या दैवतांच्या उत्सवांबद्दलच्या एकूण ३४ सुंदर लेखांचा खजिना आहे. त्याशिवाय कथा, कविता, व्यंगचित्रं आदी फराळही आहेच. एकंदरीतच हा अंक संग्राह्य आणि कोकणाबद्दलच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. या अंकातून वाचनानंद तर मिळेलच; पण पर्यटकांना वेगवेगळ्या मंदिरांची माहितीही मिळू शकेल.
पृष्ठसंख्या : १००
मूल्य : १५० रुपये
9850880119 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपलं नाव व संपूर्ण पत्ता कळवल्यास अंक घरपोच पाठवला जाईल.
मुंबई, पुणे, रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली, लांजा येथील प्रमुख वितरकांकडे अंक उपलब्ध.
ई-बुक खरेदीसाठी लिंक :
गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ
मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536
बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78 (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
अक्षरधारा – https://akshardhara.com/38761-diwali-ank.html (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
पायल बुक्स – https://bit.ly/3VTmRyl (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)


विजेत्यांची चित्रे पाहण्यासाठी, तसेच अंकाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा स्लाइडशो आणि व्हिडिओ…

