सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातलं म्हणजे वालावल हे निसर्गसंपन्न गाव ओळखलं जातं ते तिथल्या श्री लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामुळे. या मंदिराबद्दलच्या काही दंतकथा, कथा, आख्यायिका, प्रथा-परंपरा याबद्दल आशीष पणशीकर यांनी लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.
…..
‘पंढरी उभा राही सावळा पाडुरंग,
प्रतिपंढरी सारें नारायण नामें दंग’
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातलं एक निसर्गसंपन्न गाव म्हणजे वालावल होय. या गावात निसर्गरम्य व ऐतिहासिक अशी प्रेक्षणीय स्थळं आहेतच; परंतु अप्रतिम शिल्पकलेचा नमुना असलेलं प्राचीन व जागृत असं श्री लक्ष्मीनारायणाचं मंदिर हे त्यातलं अग्रगण्य. हे मंदिर हजारो भक्तांचं कित्येक पिढ्यांपासून श्रद्धास्थान आहे. देश-विदेशातल्या विविध भागांतून भाविक या देवाच्या दर्शनासाठी येतात. भाविक प्रेमाने त्याला नारोबा असंही म्हणतात. प्रतिपंढरपूर अशीही वालावल गावाची एक ओळख आहे.

‘शृंगार पाहुनी वनराणीचा मोहित प्रभू झाले
लक्ष्मीसह गरुडाला तुम्ही सोबत आणिले’
उंच डोंगर, हिरवी गर्द झाडी व गावाच्या उत्तरेला तुडुंब भरून वाहणारी नदी अशा सृष्टिसौंदर्याच्या मधोमध असलेलं श्री लक्ष्मीनारायणाचं मंदिर व त्याच्या बाजूलाच असलेला तलाव जणू सर्वांचा आकर्षणबिंदूच. सभोवतालचा परिसर व निसर्गाची किमया पाहून सर्वांना भुरळ पडते. मंदिर परिसरात रवळनाथ मंदिर, घाडवंस मंदिर, मुरलीधर मंदिर, तसंच तलावाजवळ शिवपिंडी आहे.
‘तव मुकुटी व्याघ्रांबरधारी शिव शंकर वसती;
शंख चक्क गदा पद्म तव हस्ती असती,
दक्षिण अंगे माता लक्ष्मी दिसे मनोहर,
पक्षीराज वामांगी शोभे अतीव सुंदर’
लक्ष्मीनारायणाची मूर्ती किती जुनी हे सांगणं जरा कठीणच आहे. परंतु सर्वसाधारणतः १४व्या शतकात राजा चंद्रभान व सूर्यभान यांनी हे मंदिर बांधलं, असं जाणकार इतिहासकार सांगतात. मूर्तीच्या उजव्या बाजूला लक्ष्मी व डाव्या बाजूला गरूड आहे. चालुक्यकालीन ताम्रपटावरून असं आढळून येतं, की या गावाचं चालुक्यकालीन नाव ‘बल्लावल्ली’ असं होतं. याच नावाचा नंतर अपभ्रंश होऊन वालावल असं या गावाचं नाव झालं.
संपूर्ण लेख वाचा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात… (अंक घरपोच मागवण्यासंदर्भात, तसेच अंकाच्या अंतरंगासंदर्भात माहिती पुढे दिली आहे.)
स्पर्धेतले विजेते लेख, अन्य लेख, चित्रं आदी साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात आलं आहे. या अंकात पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतल्या वेगवेगळ्या दैवतांच्या उत्सवांबद्दलच्या एकूण ३४ सुंदर लेखांचा खजिना आहे. त्याशिवाय कथा, कविता, व्यंगचित्रं आदी फराळही आहेच. एकंदरीतच हा अंक संग्राह्य आणि कोकणाबद्दलच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. या अंकातून वाचनानंद तर मिळेलच; पण पर्यटकांना वेगवेगळ्या मंदिरांची माहितीही मिळू शकेल.
पृष्ठसंख्या : १००
मूल्य : १५० रुपये
9850880119 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपलं नाव व संपूर्ण पत्ता कळवल्यास अंक घरपोच पाठवला जाईल.
मुंबई, पुणे, रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली, लांजा येथील प्रमुख वितरकांकडे अंक उपलब्ध.
ई-बुक खरेदीसाठी लिंक :
गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ
मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536
बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78 (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
अक्षरधारा – https://akshardhara.com/38761-diwali-ank.html (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
पायल बुक्स – https://bit.ly/3VTmRyl (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)


विजेत्यांची चित्रे पाहण्यासाठी, तसेच अंकाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा स्लाइडशो आणि व्हिडिओ…

