देवरूखच्या सोळजाई मंदिरात लक्षवेधी रांगोळ्या

देवरूख : देवरूखची ग्रामदेवता श्री सोळजाई मंदिरामध्ये देवरूखच्या खालच्या आळीतील हनुमान प्रासादिक बालमित्र समाज मंडळाच्या युवकांनी दिवाळीनिमित्ताने लक्षवेधी रांगोळ्या साकारल्या आहेत. त्या रांगोळ्या भक्तांच्या आणि कलारसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.

गेली अनेक वर्षे देवरूखमधील रांगोळी कलाकार अभ्यंगस्नानाच्या मंगलदिनी विविध आकर्षक विषयांवर रांगोळ्या साकारतात. श्री गणेशांची विविध रूपे ही यावर्षीच्या रांगोळी प्रदर्शनाची संकल्पना आहे. श्री गणेशांच्या विविध रूपांवर आधारित या रांगोळ्या प्रा. संदीप पवार, मंगेश नलावडे, रांगोळीमधील विश्व विक्रमवीर विलास रहाटे, अक्षय वहाळकर, सार्थक नलावडे, शिवम नलावडे यांनी साकारल्या आहेत. त्याचबरोबर संस्कारभारतीची भली मोठी रांगोळी पल्लवी, वैभवी, ममता, रुचिरा या पवार भगिनींनी आणि संदीप साळवी यांनी रेखाटली आहे.

देवरूखमधील प्रथितयश कलाकारांनी काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाला अनेक रसिक भेट देत आहेत. गेली अनेक वर्षे स्वयंस्फूर्तीने रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करणाऱ्या या युवकांचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply