रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातल्या वाटूळ या गावातला शिमगोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. या शिमगोत्सवाबद्दल विराज विलास चव्हाण यांनी लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.
…..
वाटूळ हे रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात मुचकुंदी नदीच्या तीरावर वसलेले आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेले एक सुंदर गाव. वाटूळ या नावामागे इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इथे असणाऱ्या यवनांचे (मुघलांचे) वाटोळे झाले म्हणून वाटूळ असे नाव आहे. शिवाय गावाचा भौगोलिदृष्ट्या आकार गोलाकार भासतो. म्हणूनसुद्धा गावाला वाटूळ नाव पडले असावे.

कोकणात साजरे केले जाणारे शिमगोत्सव व गणेशोत्सव हे दोन मोठे उत्सव या गावातसुद्धा मोठ्या आनंदात साजरे केले जातात. वाटूळ गावचा शिमगोत्सव म्हणजे आबालवृद्धांसाठी पर्वणीच असते. जवळपास पंधरा दिवस हा शिमगोत्सव चालतो. पौर्णिमेला दुपारी सांबाची होळी असते. दुपारी सर्व जण मिळून सांब होळी उभी करतात. रात्री गावहोळी असते. रात्री होळी तोडायला जाण्यापूर्वी संपूर्ण गाव महादेववाडीतील मांडावर जमतो. मानकरी गुरवांना ‘होळी कुठे पाहिली आहे का’ असं विचारतात. गुरवांनी ठिकाण सांगितल्यावर गावच्या देवांना नारळ देऊन सगळे ढोल-ताशांच्या गजरात मार्गस्थ होतात. होळीच्या ठिकाणी पोहोचल्यावर मानकर्यांच्या परवानगीने होळी तोडली जाते. ही होळी आंब्याच्या झाडाची असते.
संपूर्ण लेख वाचा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात… (अंक घरपोच मागवण्यासंदर्भात, तसेच अंकाच्या अंतरंगासंदर्भात माहिती पुढे दिली आहे.)
स्पर्धेतले विजेते लेख, अन्य लेख, चित्रं आदी साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात आलं आहे. या अंकात पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतल्या वेगवेगळ्या दैवतांच्या उत्सवांबद्दलच्या एकूण ३४ सुंदर लेखांचा खजिना आहे. त्याशिवाय कथा, कविता, व्यंगचित्रं आदी फराळही आहेच. एकंदरीतच हा अंक संग्राह्य आणि कोकणाबद्दलच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. या अंकातून वाचनानंद तर मिळेलच; पण पर्यटकांना वेगवेगळ्या मंदिरांची माहितीही मिळू शकेल.
पृष्ठसंख्या : १००
मूल्य : १५० रुपये
9850880119 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपलं नाव व संपूर्ण पत्ता कळवल्यास अंक घरपोच पाठवला जाईल.
मुंबई, पुणे, रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली, लांजा येथील प्रमुख वितरकांकडे अंक उपलब्ध.
ई-बुक खरेदीसाठी लिंक :
गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ
मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536
बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78 (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
अक्षरधारा – https://akshardhara.com/38761-diwali-ank.html (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
पायल बुक्स – https://bit.ly/3VTmRyl (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)


विजेत्यांची चित्रे पाहण्यासाठी, तसेच अंकाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा स्लाइडशो आणि व्हिडिओ…

