सर्वसाधारणपणे आधी मंदिर उभारले जाते आणि तेथे नंतर उत्सव साजरा केला जातो; पण मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथे आधी उत्सव साजरा होऊ लागला आणि नंतर तेथे श्री लक्ष्मीपल्लीनाथाचे भव्य-दिव्य मंदिर उभारले गेले. यातून कोकणात उत्सवप्रियता किती आहे हे दिसून येते. ‘आधी कळस, मग पाया’ या अभंगाचेच जणू हे उदाहरण आहे.
साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात उमेश आंबर्डेकर यांनी लिहिलेल्या लेखाची ही एक छोटी झलक.

…..
उत्सवप्रिय कोकणात वेगवेगळ्या उत्सवांना जाण्याविषयीची चर्चा अगदी लहानपणापासूनच घरोघरी ऐकलेली असते. नंतर उत्सवाला जाण्याचा कार्यक्रम ठरविला जातो. शिमगोत्सव, तसेच ग्रामदैवताचा उत्सव प्रत्येक गावी होत असतोच. परंतु, कार्तिकोत्सव, महाशिवरात्र, माघी गणेशोत्सव, गोपाळकृष्णाचा उत्सव असे वैशिष्ट्यपूर्ण उत्सवही अनेक होत असतात. हे उत्सव प्राधान्याने रात्रीच असतात. त्यापैकीच एक म्हणजे लक्ष्मीपल्लीनाथाचा उत्सव. परिसरातल्या १५ ते ५० किलोमीटरच्या, तसेच मुंबई-पुण्यासह अन्य शहरं आणि गावांमधून प्रवास करून कुलोपासक या उत्सवाला हजर राहतात. परिसरातील कुलोपासक आणि भक्त मंडळी पाच दिवस रात्रभर उत्सवाला हजेरी लावतात. दिवसभर कामे, नोकरीधंदा सांभाळतात आणि पुन्हा रात्री उत्सवाला हजर होतात. त्यापैकीच श्री लक्ष्मीपल्लीनाथाच्या उत्सवाची ही कथा.
पल्लीनाथ हा त्रिगुणस्वरूप आहे. शिवतत्त्वाचे आधिक्य असून, मूर्ती विष्णुस्वरूप आहे. लक्ष्मी ही योगिनी (सहायक) असून, पुरुषस्वरूपी शिवाबरोबर स्त्रीस्वरूपी शक्ती असणे जरूरच आहे. शिव आणि शक्ती हेच सर्व जगताचे मूलस्वरूप असल्याने सर्वत्र तशी योजना केली असल्याचे दिसून येते.

मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथे श्री लक्ष्मीपल्लीनाथाच्या मंदिराची उभारणी करण्यासाठी २ एकर जागा शशिभाऊ गुण्ये यांनी नाममात्र मोबदल्यात उपलब्ध करून दिली. श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ संस्थानाच्या न्यासाची रीतसर नोंदणी १७ ऑक्टोबर २०१२ रोजी झाली. सुधाकर चांदोरकर यांची अध्यक्षपदी निवड झाली. सुरुवातीला निधी संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला. सर्व कुलोपासक आणि भक्तांनी आर्थिक हातभार लावला. त्यातून मंदिराचा प्रकल्प २०१८ साली पूर्ण झाला; मात्र उत्सवाची सुरुवात २०१३ पासूनच झाली. मंदिरासाठी जागेचा ताबा घेतल्यानंतर २०१३ तेथे घुमटी बांधून पहिला उत्सव करण्याचा निर्णय झाला. तेव्हा मूर्ती तयार नव्हती. म्हणून तसबीर ठेवून पाच दिवसांचा उत्सव करण्यात आला. त्यासाठी श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर मंदिर उभारले जाईपर्यंत याच जागी दर वर्षी पाच दिवसांचा चैत्रोत्सव साजरा करण्यात आला.
आपल्या कुलस्वामीचे स्वतंत्र मंदिर उभारायचे पल्लीनाथाच्या कुलोपासकांनी ठरवल्यानंतर सात वर्षांत अपेक्षेपेक्षाही सुंदर वास्तू उभी राहिली. पंचकुंडी यज्ञाने मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. यथावकाश शंकराचार्यांच्या हस्ते मंदिरावर कलशारोहणही झाले. आता मंदिरात सुधारणा सुरूच आहेत. त्या करत असतानाच वार्षिक चैत्रोत्सव दर वर्षी (चैत्र शुद्ध दशमी ते पौर्णिमा या काळात) वाढत्या उत्साहात साजरा केला जात आहे.
या मंदिराच्या स्थापनेची कथा आणि उत्सवाबद्दल माहिती देणारा संपूर्ण लेख वाचा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात… (अंक घरपोच मागवण्यासंदर्भात, तसेच अंकाच्या अंतरंगासंदर्भात माहिती पुढे दिली आहे.)
स्पर्धेतले विजेते लेख, अन्य लेख, चित्रं आदी साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात आलं आहे. या अंकात पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतल्या वेगवेगळ्या दैवतांच्या उत्सवांबद्दलच्या एकूण ३४ सुंदर लेखांचा खजिना आहे. त्याशिवाय कथा, कविता, व्यंगचित्रं आदी फराळही आहेच. एकंदरीतच हा अंक संग्राह्य आणि कोकणाबद्दलच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. या अंकातून वाचनानंद तर मिळेलच; पण पर्यटकांना वेगवेगळ्या मंदिरांची माहितीही मिळू शकेल.
पृष्ठसंख्या : १००
मूल्य : १५० रुपये
9850880119 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपलं नाव व संपूर्ण पत्ता कळवल्यास अंक घरपोच पाठवला जाईल.
मुंबई, पुणे, रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली, लांजा येथील प्रमुख वितरकांकडे अंक उपलब्ध.
ई-बुक खरेदीसाठी लिंक :
गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ
मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536
बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78 (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
अक्षरधारा – https://akshardhara.com/38761-diwali-ank.html (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
पायल बुक्स – https://bit.ly/3VTmRyl (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)


विजेत्यांची चित्रे पाहण्यासाठी, तसेच अंकाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा स्लाइडशो आणि व्हिडिओ…


4 comments