प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध; ऑनलाइनदेखील तपासता येईल तपशील!

प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध; ऑनलाइनदेखील तपासता येईल तपशील!

रत्नागिरी : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी आज, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. प्रत्येक मतदाराने आपले नाव त्यात तपासणे आवश्यक असून, दावे व हरकती नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर अंतिम मतदारयादी चार नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती उप-जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली. ही यादी एक ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित आहे. प्रारूप मतदारयादी सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये तसेच जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या पदनिर्देशित ठिकाणी उपलब्ध आहे. मतदारांना खालील अधिकृत संकेतस्थळांवरही आपले नाव तपासता येईल.

थेट लिंक : https://voters.eci.gov.in/download-eroll?stateCode=S13 भारत निवडणूक आयोग : eci.gov.in मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र : ceoelection.maharashtra.gov.in जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी : ratnagiri.gov.in

दावे आणि हरकतींसाठी कोणता नमुना वापराल? नावनोंदणीसाठी : नमुना क्र. ६ नावावर आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी : नमुना क्र. ७ नोंदीतील दुरुस्ती किंवा पत्ता बदलण्यासाठी : नमुना क्र. ८

हे अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे ३० सप्टेंबरपर्यंत सादर करता येतील. सर्व नागरिकांनी प्रारूप मतदारयादीत आपले नाव तपासून आवश्यकतेनुसार निर्धारित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply