रत्नागिरी : एक जून ते एक सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ७३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय विचार करता वार्षिक सरासरीच्या सर्वाधिक ८८ टक्के पाऊस खेड तालुक्यात, तर सर्वांत कमी ६३ टक्के पाऊस संगमेश्वर तालुक्यात पडला. चिपळूणमध्ये ८४ टक्के, गुहागरमध्ये ८२ टक्के, दापोलीत ७५ टक्के, रत्नागिरी आणि मंडणगडमध्ये प्रत्येकी ६८ टक्के, तर राजापूर आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी ६५ टक्के एवढा पाऊस नोंदवला गेला. यंदाच्या पावसाळी हंगामाचा आता अखेरचा महिना शिल्लक असून, भातशेतीचं उत्पादन, तसंच पुढच्या वर्षीच्या पाणीटंचाईची तीव्रता किती असेल हे या अखेरच्या महिन्यातल्या पावसाच्या प्रमाणावर अवलंबून आहे. गेल्या वर्षी पावसाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या तब्बल ९७ टक्के पाऊस झाला होता. (‘महारेन’ची आकडेवारी)
Follow Kokan Media on Social Media
तीन महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ७३ टक्के पाऊस