सुमारे ५० वर्षांपूर्वी काही कारणाने खंडित झालेली उत्सवातल्या टिपऱ्यांच्या खेळाची परंपरा पावसजवळच्या कुर्धे गावाने यशस्वीरीत्या पुनरुज्जीवित केली आहे. त्यात तरुणांचा मोठा सहभाग आहे. साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात अनिकेत कोनकर यांनी लिहिलेल्या त्याविषयीच्या लेखाची ही एक छोटी झलक.
…..
कोकणातल्या अन्य गावांप्रमाणेच रत्नागिरी तालुक्यातल्या कुर्धे गावालाही उत्सवांची मोठी परंपरा आहे. या गावात महाविष्णू आणि सर्वेश्वर अशी दोन दैवतांची मंदिरं शेजारी-शेजारी आहेत. महाविष्णू-सर्वेश्वराच्या या मंदिरांत महाशिवरात्रीचा, तसंच गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. इथला गोकुळाष्टमी उत्सव २००हून अधिक वर्षांपासून सुरू आहे; मात्र या उत्सवातली टिपऱ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण खेळांची परंपरा काही कारणाने सुमारे ५० वर्षांपूर्वी बंद पडली होती. ही खंडित परंपरा २०१९ सालापासून पुन्हा सुरू करून गावकऱ्यांनी आपल्या उत्सवाचं गतवैभव प्राप्त केलं आहे. त्यामुळे आता या गावकऱ्यांचा आनंद आणि उत्साह दुधात साखर पडल्याप्रमाणे वाढला आहे.

कुर्धे हे स्वामी स्वरूपानंदांच्या पावसजवळचं गाव. श्री महाविष्णू आणि श्री सर्वेश्वर ही विष्णू आणि शंकराची जुनी मंदिरं या गावात एकमेकांच्या शेजारी वसलेली आहेत. फार पूर्वीच्या काळी महाविष्णूचं मंदिर फडके घराण्याचं, तर सर्वेश्वराचं मंदिर चक्रदेव घराण्याचं खासगी देवस्थान होतं. नंतरच्या काळात ती मंदिरं खासगी न राहता संपूर्ण गावाची झाली. त्यांचा ट्रस्टही झाला. ही मंदिरं सुमारे तीनशे वर्षं जुनी आहेत.
साधारण ५० वर्षांपूर्वी या मंदिरातल्या उत्सवातल्या टिपऱ्यांच्या खेळाची परंपरा काही कारणामुळे खंडित झाली. गावकऱ्यांच्या इच्छेमुळे आणि त्यांनी आनंदाने घेतलेल्या सहभागामुळे २०१९च्या गोकुळाष्टमी उत्सवापासून ही परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली. पावसजवळच्या गोळप गावातल्या हरिहरेश्वर मंदिरातल्या कार्तिकोत्सवाला १००हून अधिक वर्षांची परंपरा असून, तेथे त्या उत्सवात टिपऱ्या खेळल्या जातात. त्यामुळे कुर्ध्यातल्या ग्रामस्थांनी गोळपमधल्या ग्रामस्थांना या टिपऱ्या शिकण्याची इच्छा असल्याचं सांगितलं आणि त्यांनी त्यांची ही इच्छा पूर्ण केली.
संपूर्ण लेख वाचा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात… (अंक घरपोच मागवण्यासंदर्भात, तसेच अंकाच्या अंतरंगासंदर्भात माहिती पुढे दिली आहे.)
स्पर्धेतले विजेते लेख, अन्य लेख, चित्रं आदी साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात आलं आहे. या अंकात पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतल्या वेगवेगळ्या दैवतांच्या उत्सवांबद्दलच्या एकूण ३४ सुंदर लेखांचा खजिना आहे. त्याशिवाय कथा, कविता, व्यंगचित्रं आदी फराळही आहेच. एकंदरीतच हा अंक संग्राह्य आणि कोकणाबद्दलच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. या अंकातून वाचनानंद तर मिळेलच; पण पर्यटकांना वेगवेगळ्या मंदिरांची माहितीही मिळू शकेल.
पृष्ठसंख्या : १००
मूल्य : १५० रुपये
9850880119 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपलं नाव व संपूर्ण पत्ता कळवल्यास अंक घरपोच पाठवला जाईल.
मुंबई, पुणे, रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली, लांजा येथील प्रमुख वितरकांकडे अंक उपलब्ध.
ई-बुक खरेदीसाठी लिंक :
गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ
मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536
बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78 (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
अक्षरधारा – https://akshardhara.com/38761-diwali-ank.html (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
पायल बुक्स – https://bit.ly/3VTmRyl (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)


विजेत्यांची चित्रे पाहण्यासाठी, तसेच अंकाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा स्लाइडशो आणि व्हिडिओ…


One comment