कुर्धे गावाने सुरू केली हिंदू नववर्ष स्वागतयात्रेची परंपरा

कुर्धे : स्वामी स्वरूपानंदांच्या पावसजवळच्या कुर्धे (ता. जि. रत्नागिरी) या गावाने गुढीपाडव्याला शोभायात्रा काढून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची परंपरा सुरू केली. यंदाच्या गुढीपाडव्याला म्हणजेच २२ मार्च २०२३ रोजी दुपारी काढण्यात आलेल्या या गावातील पहिल्या स्वागतयात्रेत कुर्ध्यासह आजूबाजूच्या गावांतील मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती.

शिपोशीच्या हरिहरेश्वर मंदिरातील कार्तिकोत्सव

रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या शिपोशी गावात हरिहरेश्वर देवस्थानातील कार्तिकोत्सव १०० वर्षांपूर्वीपासून परंपरेने चालत आलेला आहे. त्या उत्सवाच्या अनुषंगाने एकंदरीत कोकणी माणसाच्या उत्सवप्रियतेबद्दल चिंतन करणारा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात सौ. मनीषा आठल्ये यांनी लिहिला आहे. त्या लेखाची ही एक छोटी झलक.

केळवलीचा श्री नृसिंह जयंतीचा उत्सव

रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातल्या केळवली गावात श्री नृसिंह जयंतीचा उत्सव होतो. त्या उत्सवाबद्दलचा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात श्रीप्रकाश सप्रे यांनी लिहिला आहे. त्या लेखाची ही एक छोटी झलक.

मोगरे भराडेमधील लक्ष्मीनारायण मंदिरातील गोकुळाष्टमी उत्सव

आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरापासून जवळच असलेल्या मोगरे भराडे नावाच्या गावात श्री लक्ष्मीनारायणाचे पुरातन मंदिर आहे. त्या मंदिरातील गोकुळाष्टमी उत्सवाबद्दलचा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात सुधीर परांजपे यांनी लिहिला आहे. त्या लेखाची ही एक छोटी झलक.

कांटे गावातला श्री देव लक्ष्मीकांताचा उत्सव

रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या कांटे गावात श्री लक्ष्मीकेशवाचं मंदिर आहे. ते सर्वत्र लक्ष्मीकांताचं मंदिर या नावाने प्रसिद्ध असून, त्या मंदिरात होणारा कार्तिकोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्या उत्सवाबद्दलचा लेख त्या गावच्या माहेरवाशीण सौ. स्वानंदी जोगळेकर (चेतना धोंड्ये) यांनी साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात लिहिला आहे. त्या लेखाची ही एक छोटी झलक.

कोलध्याच्या श्री मल्लिकार्जुन मंदिरातील महाशिवरात्री उत्सव

रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील कोलधे हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. या गावात श्री मल्लिकार्जुनाचे पुरातन मंदिर आहे. त्या मंदिराविषयीची माहिती, दंतकथा, तिथे होणारे उत्सव आणि महाशिवरात्रीचा मुख्य उत्सव याबद्दलचा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात संतोष श्रीराम तांबे यांनी लिहिला आहे. त्या लेखाची ही एक छोटी झलक.