रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या शिपोशी गावात हरिहरेश्वर देवस्थानातील कार्तिकोत्सव १०० वर्षांपूर्वीपासून परंपरेने चालत आलेला आहे. त्या उत्सवाच्या अनुषंगाने एकंदरीत कोकणी माणसाच्या उत्सवप्रियतेबद्दल चिंतन करणारा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात सौ. मनीषा आठल्ये यांनी लिहिला आहे. त्या लेखाची ही एक छोटी झलक.
…..
कोकणामधील अनेक गावांमध्ये गेली अनेक वर्षे उत्सव परंपरेनुसार चालत आलेले आहेत. आमच्या शिपोशी गावातसुद्धा कार्तिकोत्सव परंपरेने चालत आलेला आहे. गावामधील अनेक घरांमधील माणसे त्यांच्या नोकरीधंद्यानिमित्त शहरामध्ये राहत असतात. गावच्या उत्सवामध्ये जाण्यासाठी तयारी उत्सवाआधी आठ दिवसांपासून सुरू होते. नोकरी करणाऱ्यांची रजा, नवीन कपडे, प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाला शोभतील असे मॅचिंगचे ड्रेस, साड्या, दागदागिने यांचे नियोजन सुरू होते. एखाद्या मोठ्या समारंभाला साजेल असा शाही थाटच जणू या अशा उत्सवामध्ये अनुभवता येतो. उत्सवप्रिय माणसं आपल्या कुटुंबीयांसमवेत व मित्रपरिवाराला घेऊन शिपोशी गावातील घरी येत असतात. गावच्या घरामध्ये या सर्वांचे आनंदाने स्वागत होत असते व त्या दिवसांत गावातील प्रत्येक घर, अंगण, परसबाग अगदी उत्साहाने गजबजून जात असते.
अशाच आनंदाच्या धुंदीमध्ये प्रत्येक जण हरिहरेश्वराच्या देवळामध्ये पोहोचत असतो. शिपोशी म्हणजे आठल्ये मंडळींना इनाम मिळालेला गाव. तेथे शिवाच्या भक्तांना दररोज दर्शन घेण्यासाठी खड्गेश्वराचे प्रतीक म्हणून हरिहरेश्वराची स्थापना झाली, अशी आख्यायिका आहे.

हा उत्सव कार्तिक शुद्ध नवमीला सुरू होतो आणि पौर्णिमेला सांगता होते. नवमीला मंत्रजागर होतो. एकादशीला प्रवचन व दररोज कीर्तन, भोवत्या होतात. गाण्याची मैफल होते. पौर्णिमेला नाटक किंवा मोठा कार्यक्रम होतो. दुपारी समाराधना होतात. दुसर्या दिवशी सकाळी उत्सव समाप्त होतो.
संपूर्ण लेख वाचा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात… (अंक घरपोच मागवण्यासंदर्भात, तसेच अंकाच्या अंतरंगासंदर्भात माहिती पुढे दिली आहे.)
स्पर्धेतले विजेते लेख, अन्य लेख, चित्रं आदी साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात आलं आहे. या अंकात पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतल्या वेगवेगळ्या दैवतांच्या उत्सवांबद्दलच्या एकूण ३४ सुंदर लेखांचा खजिना आहे. त्याशिवाय कथा, कविता, व्यंगचित्रं आदी फराळही आहेच. एकंदरीतच हा अंक संग्राह्य आणि कोकणाबद्दलच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. या अंकातून वाचनानंद तर मिळेलच; पण पर्यटकांना वेगवेगळ्या मंदिरांची माहितीही मिळू शकेल.
पृष्ठसंख्या : १००
मूल्य : १५० रुपये
9850880119 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपलं नाव व संपूर्ण पत्ता कळवल्यास अंक घरपोच पाठवला जाईल.
मुंबई, पुणे, रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली, लांजा येथील प्रमुख वितरकांकडे अंक उपलब्ध.
ई-बुक खरेदीसाठी लिंक :
गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ
मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536
बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78 (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
अक्षरधारा – https://akshardhara.com/38761-diwali-ank.html (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
पायल बुक्स – https://bit.ly/3VTmRyl (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)


विजेत्यांची चित्रे पाहण्यासाठी, तसेच अंकाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा स्लाइडशो आणि व्हिडिओ…

