दैवज्ञ भवन रौप्यमहोत्सवानिमित्त रत्नागिरीत १९ पासून जिल्हा मानांकन कॅरम

रत्नागिरी : येथील दैवज्ञ भवनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दैवज्ञ हितवर्धक समाज संस्थेतर्फे येत्या १९ ते २१ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार असून स्पर्धेत ब्रेक टू फिनिश आणि ब्लॅक टू फिनिश नोंदविणाऱ्या खेळाडूंना प्रथम फेरीपासून खास रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, कुमार गट (१८ वर्षांखालील), कुमारी गट (१८ वर्षांखालील), किशोर गट (१४ वर्षांखालील) आणि किशोरी गट (१४ वर्षांखालील) अशा ७ गटांत होणार आहे. स्पर्धा अखिल भारतीय कॅरम फेडरेशन (राष्ट्रीय संघटना) आणि अंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनच्या प्रचलित स्पर्धा नियमावलीनुसार होईल. या क्रीडा वर्षातील ही चौथी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा असल्याने खेळाडूंनी २०२२-२३ या वर्षाची ५० रुपये रजिस्ट्रेशन फी जिल्हा असोसिएशनकडे जमा करावी. स्पर्धेसाठी प्रवेश फी एकेरी गटासाठी प्रत्येकी १५० रुपये, पुरुष दुहेरी प्रत्येकी ३०० रुपये राहील. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल. इच्छुक सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धा शुल्कासहित द्यावयाच्या आहेत. स्पर्धेत सामना खेळण्यासाठी पांढरा टीशर्ट किंवा शर्ट खेळाडूने परिधान करणे आवश्यक आहे.

स्पर्धेचे अर्ज आणि शुल्क जमा करण्यासाठी संपर्क – १) गुहागर – प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), २) चिपळूण – साईप्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), ३) देवरूख – मोहन हजारे (९४२२०५३९४३), ४) रत्नागिरी – विनायक जोशी (८३९०३८७४८३), ५) संगमेश्वर – मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५), ६) खेड – योगेश आपटे (०९९५८५३२२२६३९).

स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून कॅरम राज्यस्तरीय पंच मंदार दळवी आणि सागर कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. सचिन बंदरकर स्पर्धा प्रमुख असतील. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरीच्या दैवज्ञ हितवर्धक समाज संस्थेचे अध्यक्ष विजय पेडणेकर, सचिव महेश खेडेकर, जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय रेडीज आणि सचिव मिलिंद साप्ते यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply