रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातल्या केळवली गावात श्री नृसिंह जयंतीचा उत्सव होतो. त्या उत्सवाबद्दलचा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात श्रीप्रकाश सप्रे यांनी लिहिला आहे. त्या लेखाची ही एक छोटी झलक.
…..
कोकणातले उत्सव म्हटलं, की प्रकर्षाने डोळ्यांसमोर येतात गणेशोत्सव आणि शिमगोत्सव; मात्र या दोन उत्सवांप्रमाणेच वेगवेगळ्या गावांतील देव, देवी यांचेही उत्सव असतात. शिवाय कोणाच्या कुलदैवतांचेही उत्सव साजरे केले जातात.
राजापूरपासून २२ किलोमीटरवर आमचे केळवली नावाचे गाव आहे. श्री नृसिंह हे आम्हा सप्रे मंडळींचे कुलदैवत आहे. श्री शांतादुर्गा ही कुलदेवता. यांचे मंदिर सर्वांनी मिळून २००८मध्ये बांधले आहे. मंदिराच्या आधी हा उत्सव केळवली, पांगरे, जवळेथर, ओशिवळे येथे राहणाऱ्या सप्रे कुटुंबीयांकडे होत असे. आता २००८पासून हा उत्सव मंदिरात होतो.

वैशाख शुद्ध दशमी ते पौर्णिमा या काळात नृसिंह जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. उत्सवामध्ये धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. या उत्सवातला पालखी नाचवण्याचा विधी हे विशेष आकर्षण. जवळपास तीन तास पालखी खाली ठेवली जात नाही. एकंदरीत उत्सव अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतो.
संपूर्ण लेख वाचा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात… (अंक घरपोच मागवण्यासंदर्भात, तसेच अंकाच्या अंतरंगासंदर्भात माहिती पुढे दिली आहे.)
स्पर्धेतले विजेते लेख, अन्य लेख, चित्रं आदी साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात आलं आहे. या अंकात पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतल्या वेगवेगळ्या दैवतांच्या उत्सवांबद्दलच्या एकूण ३४ सुंदर लेखांचा खजिना आहे. त्याशिवाय कथा, कविता, व्यंगचित्रं आदी फराळही आहेच. एकंदरीतच हा अंक संग्राह्य आणि कोकणाबद्दलच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. या अंकातून वाचनानंद तर मिळेलच; पण पर्यटकांना वेगवेगळ्या मंदिरांची माहितीही मिळू शकेल.
पृष्ठसंख्या : १००
मूल्य : १५० रुपये
9850880119 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपलं नाव व संपूर्ण पत्ता कळवल्यास अंक घरपोच पाठवला जाईल.
मुंबई, पुणे, रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली, लांजा येथील प्रमुख वितरकांकडे अंक उपलब्ध.
ई-बुक खरेदीसाठी लिंक :
गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ
मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536
बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78 (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
अक्षरधारा – https://akshardhara.com/38761-diwali-ank.html (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
पायल बुक्स – https://bit.ly/3VTmRyl (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)


विजेत्यांची चित्रे पाहण्यासाठी, तसेच अंकाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा स्लाइडशो आणि व्हिडिओ…

