मोगरे भराडेमधील लक्ष्मीनारायण मंदिरातील गोकुळाष्टमी उत्सव

आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरापासून जवळच असलेल्या मोगरे भराडे नावाच्या गावात श्री लक्ष्मीनारायणाचे पुरातन मंदिर आहे. त्या मंदिरातील गोकुळाष्टमी उत्सवाबद्दलचा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात सुधीर परांजपे यांनी लिहिला आहे. त्या लेखाची ही एक छोटी झलक.

…..

रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्री देवी महाकालीच्या प्रसिद्ध देवस्थानापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर मोगरे भराडे या गावी वैष्णवी नदीच्या तीरावर श्रीदेव लक्ष्मीनारायणाचे सुंदर, भव्य मंदिर आहे. शके १५३३ म्हणजेच इ. स. १६११ म्हणजेच साधारण ४०० वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे. श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांनीदेखील या लक्ष्मीनारायण मंदिराच्या सभामंडपाच्या बांधकामाला १०० झाप दिल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो. मोठमोठ्या लाकडी तुळयांवर बांधकाम केलेले कौलारू मंदिर व सुंदर जांभ्या दगडाचे बांधकाम असलेली भोवतालची भक्कम चिरेबंदी हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

समस्त परांजपे-देव-मंडलिक कुटुंबीयांचे श्रद्धास्थान व कुलस्वामी असलेल्या या श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिराचा कालानुरूप जीर्णोद्धार २०१४ साली परांजपे कुटुंबीयांच्या व स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या आर्थिक देणग्यांच्या साह्याने करण्यात आला.

श्री देव लक्ष्मीनारायणाचा मुख्य उत्सव गोकुळाष्टमीचा. श्रावण कृष्ण सप्तमी व अष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जयंती व गोपाळकाला या दोन दिवशी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. आश्विन शुद्ध पौर्णिमा ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा या काळातदेखील देवळात उत्सव साजरा होतो. याला कार्तिकी उत्सव असे संबोधले जाते.

संपूर्ण लेख वाचा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात… (अंक घरपोच मागवण्यासंदर्भात, तसेच अंकाच्या अंतरंगासंदर्भात माहिती पुढे दिली आहे.)

स्पर्धेतले विजेते लेख, अन्य लेख, चित्रं आदी साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात आलं आहे. या अंकात पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतल्या वेगवेगळ्या दैवतांच्या उत्सवांबद्दलच्या एकूण ३४ सुंदर लेखांचा खजिना आहे. त्याशिवाय कथा, कविता, व्यंगचित्रं आदी फराळही आहेच. एकंदरीतच हा अंक संग्राह्य आणि कोकणाबद्दलच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. या अंकातून वाचनानंद तर मिळेलच; पण पर्यटकांना वेगवेगळ्या मंदिरांची माहितीही मिळू शकेल.
पृष्ठसंख्या : १००
मूल्य : १५० रुपये

9850880119 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर आपलं नाव व संपूर्ण पत्ता कळवल्यास अंक घरपोच पाठवला जाईल.

मुंबई, पुणे, रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली, लांजा येथील प्रमुख वितरकांकडे अंक उपलब्ध.

ई-बुक खरेदीसाठी लिंक :

गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ

मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536

बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78 (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)

अक्षरधारा – https://akshardhara.com/38761-diwali-ank.html (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)

पायल बुक्स – https://bit.ly/3VTmRyl (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)

विजेत्यांची चित्रे पाहण्यासाठी, तसेच अंकाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा स्लाइडशो आणि व्हिडिओ…

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply