रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या कांटे गावात श्री लक्ष्मीकेशवाचं मंदिर आहे. ते सर्वत्र लक्ष्मीकांताचं मंदिर या नावाने प्रसिद्ध असून, त्या मंदिरात होणारा कार्तिकोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्या उत्सवाबद्दलचा लेख त्या गावच्या माहेरवाशीण सौ. स्वानंदी जोगळेकर (चेतना धोंड्ये) यांनी साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात लिहिला आहे. त्या लेखाची ही एक छोटी झलक.
…..
कोकण म्हणजे उत्सवांचं माहेरघर. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांसारखे अनेक सार्वजनिक उत्सव मोठ्या दणक्यात साजरे होत असले, तरी कोकणातले सण, इथला उत्साह, इथली लगबग आणि कोकणातले पारंपरिक उत्सव यांची सर शहरातल्या झगझगाटातल्या धांगडधिंग्यात नाही. म्हणून तर होळी, गणेशोत्सव या काळात बाहेरगावी असलेला कोकणी माणूस कोकणात परततो. कोकणातले सण, कोकणातल्या गावागावांतले पारंपरिक उत्सव यांची बातच न्यारी आहे.
लांजा तालुक्यातलं कांटे गाव म्हणजे माझं माहेर. डोंगरदऱ्यांत आणि बेनी नदीच्या काठी वसलेलं, शंभर-दीडशे उंबरठ्यांचं माझं गाव. अजूनही मोबाइल नेटवर्क नसलेलं हे गाव. सुंदर हिरवाई, श्री महालक्ष्मी मातेजवळचा खळखळून वाहणारा पाण्याचा झरा, बकुळ फुलांचा सडा, ग्रामदेवता श्री जाकादेवीचं मंदिर ही कांटे गावाची ठळक वैशिष्ट्यं. शिमगोत्सव, रंगपंचमी, खुणा काढणे यांसारख्या अनेक पारंपरिक कार्यक्रमांचा उत्साह गावात कायमच असतो. त्यात सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगवेगळ्या परंपरा असणारी गोष्ट आजही गावात अविरतपणे चालू आहे आणि ती म्हणजे श्री लक्ष्मीकेशवाचा उत्सव.

कांटे गावात ब्राह्मणवाडीमध्ये दोन मंदिरं आहेत. एक श्री सांब शंकराचं आणि दुसरं श्री लक्ष्मीकेशवाचं म्हणजेच श्री लक्ष्मीकांताचं. जवळच पिंपळाचा एक डेरेदार वृक्ष आहे. त्याच्या बाजूला श्री मारुतीची आणि श्री देवीची अशा दोन छोट्या व सुबक घुमट्या आहेत. श्री लक्ष्मीकांताचा उत्सव दर वर्षी मोठ्या उत्साहात व दणक्यात साजरा होतो. हा उत्सव कार्तिक कृष्ण दशमी ते कार्तिक अमावास्येपर्यंत म्हणजे (देवदीपावली उजेडीपर्यंत) साजरा होतो. त्याचे पडघम दोन-अडीच महिने आधीपासूनच वाजू लागतात. या उत्सवाला कित्येक वर्षांची परंपरा आहे आणि आजपर्यंत या उत्सवाच्या परंपरेत खंड पडलेला नाही. गावातले स्थानिक नागरिक आणि पंचक्रोशीतली ब्राह्मण कुटुंबं मोठ्या उत्साहात सहा-सात दिवस उत्सवाला हजेरी लावतात. उत्सव सुरू होण्यापूर्वी देवळाची व देवळाच्या परिसराची साफसफाई होते. त्याला देऊळबेणणी असं म्हणतात. ही देवळाची साफसफाई व बेणणी संपूर्ण गाव करतो. देवळाला दिव्यांच्या माळा, पताका, फुलं यांनी सुशोभित केलं जातं. सुरेल गाण्यांचा नाद सुरू होतो आणि सुरू होतो उत्सव उत्साहाचा… उत्सव आनंदाचा…
संपूर्ण लेख वाचा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात… (अंक घरपोच मागवण्यासंदर्भात, तसेच अंकाच्या अंतरंगासंदर्भात माहिती पुढे दिली आहे.)
स्पर्धेतले विजेते लेख, अन्य लेख, चित्रं आदी साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात आलं आहे. या अंकात पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतल्या वेगवेगळ्या दैवतांच्या उत्सवांबद्दलच्या एकूण ३४ सुंदर लेखांचा खजिना आहे. त्याशिवाय कथा, कविता, व्यंगचित्रं आदी फराळही आहेच. एकंदरीतच हा अंक संग्राह्य आणि कोकणाबद्दलच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. या अंकातून वाचनानंद तर मिळेलच; पण पर्यटकांना वेगवेगळ्या मंदिरांची माहितीही मिळू शकेल.
पृष्ठसंख्या : १००
मूल्य : १५० रुपये
9850880119 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपलं नाव व संपूर्ण पत्ता कळवल्यास अंक घरपोच पाठवला जाईल.
मुंबई, पुणे, रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली, लांजा येथील प्रमुख वितरकांकडे अंक उपलब्ध.
ई-बुक खरेदीसाठी लिंक :
गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ
मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536
बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78 (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
अक्षरधारा – https://akshardhara.com/38761-diwali-ank.html (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
पायल बुक्स – https://bit.ly/3VTmRyl (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)


विजेत्यांची चित्रे पाहण्यासाठी, तसेच अंकाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा स्लाइडशो आणि व्हिडिओ…

