चिंदर (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) या गावातील श्री देवी भगवती माउलीच्या दिंडेजत्रेबद्दल विवेक (राजू) परब यांनी साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखाची ही छोटीशी झलक…
…..
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यामध्ये एका बाजूला स्वच्छ सुंदर नदीकिनारे, माड-पोफळीच्या बागा आणि दुसऱ्या बाजूला डोंगराची उंचचउंच नैसर्गिक झालर अशा निसर्गरम्य परिसरात वसलेलं गाव म्हणजे चिंदर. नवसाला पावणारं व भक्तांच्या हाकेला धावणारं गावाचं आराध्य दैवत म्हणजेच श्री देवी भगवती माउली. या चिंदर गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे अजूनही ‘गावपळण-देवपळण’ या प्राचीन सांस्कृतिक परंपरांचं पालन केलं जातं.
भगवती मंदिर गावच्या पश्चिमेकडच्या हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. देवीचं मूळ स्थान डोंगराच्या उंच भागात असून, तिथे पायऱ्या चढून जावं लागतं. तिथूनच काही अंतरावर भगवती मातेचं भव्य-दिव्य मंदिर असून, तिथे नित्यनियमाने पूजा-अर्चा केली जाते. भगवती मातेची मूर्ती महिषासुरमर्दिनी अवतारात असून, हातात खड्ग, त्रिशूळ, नाग धारण केलेला आहे. भगवती मातेचा जत्रोत्सव प्रति वर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला मोठ्या दिमाखात उत्साहपूर्ण व भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जातो.
गावकऱ्यांना जेव्हा देवीचं प्रथम दर्शन झालं तेव्हा दिंडे नावाची वनस्पती देवीच्या अवतीभवती होती. या उत्सवात दिंड्यांच्या अर्धा फूट लांब काठ्यांच्या टोकाला चिंध्या बांधून त्या तेलात बुडवून पेटवल्या जातात. ‘उदे गं अंबे उदे!’च्या जयघोषात गोंधळ साजरा होतो. यासाठीच ही जत्रा राज्यभरात दिंडेजत्रा म्हणून प्रसिद्ध आहे.
संपूर्ण लेख वाचा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात… (अंक घरपोच मागवण्यासंदर्भात, तसेच अंकाच्या अंतरंगासंदर्भात माहिती पुढे दिली आहे.)
स्पर्धेतले विजेते लेख, अन्य लेख, चित्रं आदी साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात आलं आहे. या अंकात पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतल्या वेगवेगळ्या दैवतांच्या उत्सवांबद्दलच्या एकूण ३४ सुंदर लेखांचा खजिना आहे. त्याशिवाय कथा, कविता, व्यंगचित्रं आदी फराळही आहेच. एकंदरीतच हा अंक संग्राह्य आणि कोकणाबद्दलच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. या अंकातून वाचनानंद तर मिळेलच; पण पर्यटकांना वेगवेगळ्या मंदिरांची माहितीही मिळू शकेल.
पृष्ठसंख्या : १००
मूल्य : १५० रुपये
9850880119 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपलं नाव व संपूर्ण पत्ता कळवल्यास अंक घरपोच पाठवला जाईल.
मुंबई, पुणे, रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली, लांजा येथील प्रमुख वितरकांकडे अंक उपलब्ध.
ई-बुक खरेदीसाठी लिंक :
गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ
मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536
बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78 (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
अक्षरधारा – https://akshardhara.com/38761-diwali-ank.html (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
पायल बुक्स – https://bit.ly/3VTmRyl (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)


विजेत्यांची चित्रे पाहण्यासाठी, तसेच अंकाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा स्लाइडशो आणि व्हिडिओ…









