सदानंद झो आणि हर्ष नकाशे ठरले यंदाच्या स्वरसिंधुरत्न पुरस्काराचे मानकरी

प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. अशोक वासुदेव प्रभू यांच्या चौथ्या स्मृतिदिनी (१३ मे २०२५) वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वरसिंधुरत्न हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. सदानंद झो आणि हर्ष नकाशे यांची यंदाच्या स्वरसिंधुरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुरस्कार वितरण सोहळा दर वर्षीप्रमाणे आषाढी एकादशीला होणार आहे.

यंदाचा स्वरसिंधुरत्न किताब शुभम राणे आणि दत्तराज च्यारी यांना

प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. अशोक वासुदेव प्रभू यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्वरसिंधुरत्न हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. शुभम राणे आणि दत्तराज च्यारी यांची यंदाच्या स्वरसिंधुरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

पाचशे वर्षांची परंपरा जपत वालावलचा रामनवमी उत्सव सुरू

कुडाळ : वालावल (ता. कुडाळ) येथील लक्ष्मीनारायण मंदिरात आज झालेल्या मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे गुढीपाडव्याची रंगत वाढली. पाचशे वर्षांची परंपरा असलेल्या या रामनवमी उत्सवातील पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसादही मिळाला.

माजगावचे भजनी बुवा विजय माधव यांना कला सन्मान पुरस्कार जाहीर

सावंतवाडी : माजगाव (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील प्रसिद्ध भजनी बुवा विजय गोपाळ माधव यांना पुण्यातील आर्ट बीट्स संस्थेचा २०२२-२३चा राज्यस्तरीय कला सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.

माजगावमध्ये आषाढी एकादशीला रंगली भक्तिसंगीताची मैफल

सावंतवाडी : आषाढी एकादशीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातल्या माजगावमधील (नाईकवाडा) श्री देव महादेव मंदिरात ‘पंढरीची वारी’ ही भक्तिसंगीताची मैफल २९ जून २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती.

स्वरसिंधुरत्न पुरस्कारांचे थाटात वितरण

वालावल : डॉ. अशोक प्रभू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या स्वरसिंधुरत्न शास्त्रीय गायन स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कारांचे विशेष सोहळ्यात वितरण करण्यात आले. वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर (२९ जून २०२३) या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.