सावंतवाडी : आषाढी एकादशीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातल्या माजगावमधील (नाईकवाडा) श्री देव महादेव मंदिरात ‘पंढरीची वारी’ ही भक्तिसंगीताची मैफल २९ जून २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. माजगाव संगीत मित्रमंडळाने सादर केलेल्या या कार्यक्रमामुळे एकादशीची संध्याकाळ भक्तिरसाने भारून गेली. या मैफलीचा आस्वाद घेण्यासाठी रसिक संगीतप्रेमी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सानिका गावडे, स्वानंदी सावंत, मधुरा सावंत, गौरांगी सावंत, अथर्व नाईक, विलास नाईक, अजित सावंत, प्रशांत मांजरेकर, गजानन मांजरेकर या गायकांनी मिळून या संपूर्ण मैफलीत २० भक्तिगीते सादर केली. त्या गीतांना रसिकांची दाद मिळाली. या गायकांना विवेकानंद सावंत, विजय माधव, विक्रम कासार, संकेत म्हापणकर (तबला), चैताली सावंत (की-बोर्ड), हनुमंत सावंत (हार्मोनियम) आणि अथर्व नाईक, प्रशांत मांजरेकर (टाळ) यांनी साथसंगत केली. संजय गावडे यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले.
(या कार्यक्रमाचे काही अंश दर्शविणारा व्हिडिओ सोबत दिला आहे.)

