गुरुपौर्णिमेनिमित्त रत्नागिरीतील संकल्प कला मंचातर्फे गुणवंतांचा गौरव

रत्नागिरी : दर वर्षी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून समाजातील गुणवंतांचा गौरव करण्याचे कार्य रत्नागिरीतील संकल्प कला मंच ही संस्था गेली २८ वर्षे करत आहे. संस्थेने यंदाचा अर्थात २८वा गुणगौरव कार्यक्रम गुरुपौर्णिमेदिवशी (३ जुलै २०२३) आयोजित केला होता. विविध क्षेत्रांतल्या गुणवंतांना त्यांनी समाजात केलेल्या योगदानाबद्दल या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

संकल्प कला मंचाने भारतीय नाविक सेना युनियन (मुंबई) आणि टीडब्लूजे असोसिएट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरीच्या मारुती मंदिर परिसरात महिला मंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद समीर इंदुलकर यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून ‘इन्फिगो’चे डॉ. श्रीधर ठाकूर, तसेच ‘टीडब्लूजे’चे प्रतिनिधी प्रसाद खेर उपस्थित होते.

कार्यक्रमात पुढील गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
अपेक्षा सुतार, आरती कांबळे, बाळ पाटणकर, डॉ. सुजित जाधव, शाश्वत मानकर, स्मितल चव्हाण, अ‍ॅड. अविनाश काळे (गोळप कट्टा), महेश मिलके स्विमिंग ग्रुप, सुनील बेंडखळे, संजय कुळ्ये, संदेश पाल्ये, राजेश गोसावी, माधुरी कळंबटे, तेजस्वी सावंत, रूपेश शेलार, वल्लभ वणजू, कलारंग नाट्य प्रतिष्ठान (वरवडे), अवेश्री प्रकाशन

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर पाटील आणि धनवंत कासेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सल्लागार डॉ. दिलीप पाखरे यांनी करून दिला. प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन संकल्प कला मंचाचे अध्यक्ष विनोद वायंगणकर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संकल्प कला मंचाचे प्रकाश ठीक, गुळवणी सर, उपरकर सर, चंद्रकांत कांबळे, कृष्णकांत साळवी, नंदू भारती, सत्यविजय शिवलकर, सागर वायंगणकर, आशिष पाटील, सुयोग बारगोडे, रवींद्र मुळ्ये, सोनम साळुंखे, रक्षिता पालव, शलाका देसाई, प्रीतम साळुंखे इत्यादी सभासद, तसेच ‘टीडब्लूजे’चा स्टाफ आणि भारतीय नाविक सेना युनियनच्या सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply