पाचशे वर्षांची परंपरा जपत वालावलचा रामनवमी उत्सव सुरू

कुडाळ : वालावल (ता. कुडाळ) येथील लक्ष्मीनारायण मंदिरात आज झालेल्या मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे गुढीपाडव्याची रंगत वाढली. पाचशे वर्षांची परंपरा असलेल्या या रामनवमी उत्सवातील पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसादही मिळाला.

या कार्यक्रमांमध्ये गावातील ३० कलाकारांचा सहभाग होता. स्टेट बँकेच्या वालावल शाखेच्या सहकार्याने या सर्व सहभागी मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. पाडव्याच्या या उत्सवात एकापेक्षा एक सरस सादर नृत्ये सादर करून मुलांनी कार्यक्रमाची रंगत वाढवत नेली.

वालावल गावचा रामनवमी महोत्सव महत्त्वाचा असतो. अलीकडे मोठमोठ्या शहरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. ढोल पथक, लेझीम पथक असे उत्सवाचे चित्र शहरांमध्ये दिसते. पण वालावल गाव गेली पाचशे वर्षे गुढीपाडवा ते एकादशीपर्यंत सजलेला असतो. प्रत्येक घरात उत्साह संचारलेला असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांत मोठा पारंपरिक उत्सव म्हणून या उत्सवाची गणना केली जाते.

या उत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते. कार्यक्रमही दर्जेदार निवडले जातात. वालावलच्या लक्ष्मीनारायण मंदिराचा रंगमंच म्हणजे दशावतार कलेची जन्मभूमी आहे. या रंगमंचावर मोठमोठ्या कलाकारांच्या कला सादर झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आजच्या गुढीपाडव्याच्या चैतन्यमय दिवशी वालावल गावातील बालकाराकारांना व्यासपीठ मिळावे, या मुख्य उद्देशाने देवस्थान कमिटीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप साळस्कर आणि बदल चौधरी यांनी केले. देवस्थान कमिटी सदस्य गुरू देसाई, सचिव शेखर परब, नाथा वालावलकर आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply