आदिपंढरी वालावलच्या नारायणाची माळ पंढरपूरच्या विठोबाच्या गळ्यात

वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील लक्ष्मीनारायणाच्या अंगावरील वस्त्र आणि तुळशीच्या मंजिऱ्यांची माळ घातल्यानंतरच महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचा आषाढी एकादशीचा उत्सव सुरू होतो. या लक्ष्मीनारायणाचे मंदिर असलेल्या वालावल गावाला म्हणूनच ‘आदिपंढरी’ म्हणून ओळखले जाते. या मंदिरात आषाढी एकादशीला होणारा उत्सव यंदा करोनामुळे मोजक्या उपस्थितीत होत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने, हे मंदिर आणि उत्सवाची माहिती देणारा लेख…

वालावलपुरी उभा मुरारी, वैकुंठीचा राया…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातलं म्हणजे वालावल हे निसर्गसंपन्न गाव ओळखलं जातं ते तिथल्या श्री लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामुळे. या मंदिराबद्दलच्या काही दंतकथा, कथा, आख्यायिका, प्रथा-परंपरा याबद्दल आशीष पणशीकर यांनी लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.

रुग्णांच्या ‘प्रभू’चं प्रस्थान!

अशोक प्रभू आता आपल्याबरोबर या जगात नाहीत, या बातमीवर अत्यंत नाइलाजानं विश्वास ठेवावा लागतोय. हे लिहितानाही हात थरथरताहेत. कंठ दाटून आलाय. मनात विचारांचं काहूर माजलं आहे. आठवणींचे अनेक कप्पे उलगडताहेत आणि ते उलगडताना पुन्हा कंठ दाटून येतोय.

वालावलची रामनवमी

या वर्षी करोना विषाणूच्या प्रभावामुळे आमच्या वालावल गावातील रामनवमीचा उत्सव हा सार्वजनिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी रद्द करण्यात आला आहे. हा उत्सव रद्द करताना मनातील ज्या भावनेवर दगड ठेवला गेला तो गावातील प्रत्येकाला स्वीकारताना जड जात आहे. या उत्सवाची मजा काही औरच असते. ती ज्याने अनुभवली तो आज नक्की चुकचुकत असणार यात तिळमात्रदेखील शंका नाही.