गोवा शिपयार्ड कंपनीचा भागधारकांना १४० टक्के लाभांश

रत्नागिरी : गोवा शिपयार्ड कंपनीने आपल्या भागधारकांना १४० टक्के लाभांश जाहीर केला आहे. कंपनीचे रत्नागिरीतील संचालक अॅड. दीपक पटवर्धन यांनी ही माहिती दिली.

त्रिपुट जहाजाच्या जलावतरणाचा सोहळा अनोखा : दीपक पटवर्धन

रत्नागिरी : गोवा शिपयार्डने स्वतः निर्माण केलेल्या महाकाय त्रिपुट जहाजाचा जलावतरण समारंभ अनोखा होता, अशा शब्दांत गोवा शिपयार्डचे स्वतंत्र संचालक रत्नागिरीचे ॲड. दीपक पटवर्धन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गोवा शिपयार्डचे काही उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात सुरू करण्याचा प्रयत्न – अॅड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : गोवा शिपयार्डच्या विस्तारात काही उपक्रम रत्नागिरीमध्ये सुरू करण्यासंदर्भात विचार होऊ शकतो. तसेच या प्रोजेक्टच्या विविध कामांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना काम देता आले, तर नियुक्तीचा खरा आनंद मिळेल, असे गोवा शिपयार्डमध्ये स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त झालेले दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजप अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.