मुंबई : करोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रिपरिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. आता मिशन बिगिन अगेनच्या ऐवजी ब्रेक द चेन आदेश लागू राहणार आहेत. रात्रीची संचारबंदी आणि दिवसभर जमावबंदी असे या मोहिमेचे स्वरूप असेल. सोमवार ५ एप्रिलच्या रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत त्याची अंमलबजावणी केली जाईल.