चाळीस वर्षांत १२८ पारितोषिके, रंगकर्मी सुहास भोळे यांची कमाई

रत्नागिरी : चाळीसपेक्षा जास्त वर्षे एकांकिका, नाटक, मालिका, चित्रपट इत्यादींमध्ये अभिनय, निर्माता, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ इत्यादी अनेक बाबतीत योगदान करणारे आणि १२८ पारितोषिके मिळविणारे रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे यांनी आपला जीवनप्रवास उलगडला.