बालदिनानिमित्त आज रत्नागिरीत बालकांकडून ‘स्वराभिषेक’

निरागस सुरांची मैफल आज (१४ नोव्हेंबर २०२२) रत्नागिरीकर रसिकांचे कान तृप्त करणार आहे. या मैफलीत गायन तर लहान मुले करणार आहेतच; पण संवादिनी, तबला, पखवाज, तालवाद्यं आदींची साथही मुलेच करणार आहेत. एवढेच नव्हे, तर या मैफलीचे निवेदनही मुलेच करणार आहेत. मैफलीचे ध्वनिसंयोजन आणि आयोजनही मुलेच करणार आहेत. ‘सूर निरागस’ असे या मैफलीचे नाव आहे.

डॉ. अलका देव-मारुलकर यांची रत्नागिरीत शास्त्रीय संगीत कार्यशाळा

रत्नागिरी : विदुषी डॉ. अलका देव-मारुलकर यांची शास्त्रीय संगीत कार्यशाळा येथील स्वराभिषेक संस्थेतर्फे येत्या २ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.