रत्नागिरी : कृषी दिन अर्थात एक जुलैपासून स्वराज्य अॅग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे रत्नागिरीत कल्पवृक्ष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये नारळ पिकासंदर्भात मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा उपक्रम सात जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.