आंबोलीतील जैवविविधतेबद्दल ‘निसर्गरंग’च्या ऑनलाइन कट्ट्यावर गप्पा; रविवारी पाच वाजता

आंबोलीच्या या सगळ्या जैवविविधतेची ओळख करून घ्यायची असेल, तर ‘निसर्गरंग’च्या कट्ट्यावर आज (चार ऑक्टोबर २०२०) सायंकाळी पाच वाजता जरूर सहभागी व्हा. तरुण वन्यजीव अभ्यासक अनीश परदेशी या कट्ट्यावर गप्पा मारणार असून, या जैवविविधतेची ओळख करून देणार आहेत.

Continue reading

मुलांना निसर्गाची गोडी लावण्यासाठी ऑनलाइन ‘निसर्गरंग’ पाक्षिक सुरू

निसर्गातील घटकांची आवड मुलांना अगदी लहानपणापासूनच असते; मात्र ती आवड जोपासली जाण्यासाठी अनुकूल वातावरण किंवा साहित्य प्रत्येकाला सहजपणे उपलब्ध होतेच असे नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन खास मुलांसाठी निसर्गरंग या ऑनलाइन मराठी पाक्षिकाची सुरुवात करण्यात आली आहे. मुलांमध्ये निसर्गसंवर्धनाचे बीज रुजविण्याच्या हेतूने पुण्यातील तेर पॉलिसी सेंटर या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या संस्थेच्या पुढाकाराने आणि पॅरामाउंट डिजिकॉम या संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

Continue reading