आंबोलीतील जैवविविधतेबद्दल ‘निसर्गरंग’च्या ऑनलाइन कट्ट्यावर गप्पा; रविवारी पाच वाजता

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीजवळचे आंबोली हे पर्यटकांचे अत्यंत आवडते ठिकाण. महाराष्ट्राची चेरापुंजी अशी या आंबोलीची ओळख आहे. कारण तिथे पडणारा मुसळधार पाऊस. या प्रचंड पावसामुळे कोसळणारे धबधबे, सगळीकडे पसरलेले दाट धुके आदींमुळे पर्यटकांना जणू स्वर्गीय अनुभूती मिळते. या पावसामुळेच आंबोली जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे. आंबोलीच्या घनदाट जंगलांमध्ये तऱ्हेतऱ्हेचे साप, बेडूक आणि वेगवेगळ्या प्रकारचे वन्य प्राणी सुखेनैव नांदतात. वनस्पती, पक्षी आणि जलचरांचीही विविधता तेथे आढळते. आंबोली आणि आसपासच्या जंगलात फुलपाखरांच्या तब्बल २०४हून अधिक प्रजातींची नोंद झाली आहे. आंबोलीच्या या सगळ्या जैवविविधतेची ओळख करून घ्यायची असेल, तर ‘निसर्गरंग’च्या कट्ट्यावर आज (चार ऑक्टोबर २०२०) सायंकाळी पाच वाजता जरूर सहभागी व्हा. तरुण वन्यजीव अभ्यासक अनीश परदेशी या कट्ट्यावर गप्पा मारणार असून, या जैवविविधतेची ओळख करून देणार आहेत.

ऑनलाइन कट्ट्यावर कसे सहभागी व्हाल?
झूम मीटिंग लिंक : https://us02web.zoom.us/j/5391720053?pwd=c09QMGpiME5scVZyS0VYcVJiMFZRUT09

Meeting ID : 539 172 0053
Passcode : 12345

निसर्गरंगविषयी…
निसर्गातील घटकांची आवड मुलांना अगदी लहानपणापासूनच असते; मात्र ती आवड जोपासली जाण्यासाठी अनुकूल वातावरण किंवा साहित्य प्रत्येकाला सहजपणे उपलब्ध होतेच असे नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन खास मुलांसाठी निसर्गरंग या ऑनलाइन मराठी पाक्षिकाची सुरुवात करण्यात आली आहे. मुलांमध्ये निसर्गसंवर्धनाचे बीज रुजविण्याच्या हेतूने पुण्यातील तेर पॉलिसी सेंटर या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या संस्थेच्या पुढाकाराने आणि पॅरामाउंट डिजिकॉम या संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

निसर्गरंगविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
…..

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply