छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास जगासमोर मांडणे हे बाबासाहेब पुरंदरेंचे ईश्वरी कार्य : अॅड. विलास पाटणे

‘सतत वाचन, आनंदी-सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर मांडण्याचे ईश्वरी कार्य केले. आयुष्यभर प्रवास करून दिलेल्या व्याख्यानांतून मिळालेला पैसा बाबासाहेबांनी शिवप्रतिष्ठानकडे सुपूर्द केला. पुण्यातील आंबेगाव येथे २१ एकर जमिनीवर भव्य शिवसृष्टी निर्माण व्हावी, हे बाबासाहेबांनी आयुष्यभर उराशी बाळगलेले एक स्वप्न आहे. शिवचरित्र समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य तुमचे-आमचे सर्वांचे आहे. या कार्यातूनच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली वाहू या,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ विलास पाटणे यांनी केले.

Continue reading

शिवराय समजावून सांगणारा शाहीर

पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज, १५ नोव्हेंबर २०२१ (कार्तिकी एकादशी) रोजी पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. याच वर्षी जुलै महिन्यात त्यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यांच्या आठवणी जागवणारा हा लेख..

Continue reading

राज्यातील पाऊस, नैसर्गिक आपत्तींची ‘लाइव्ह’ माहिती लोकसहभागातून देणारी ‘सतर्क’ची वेबसाइट सुरू

‘सेंटर फॉर सिटिझन सायन्स’च्या (सीसीएस) ‘सतर्क’ या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून महाराष्ट्रातील पावसाच्या सद्यस्थितीची माहिती देणारी http://www.citizenweather.in ही वेबसाइट ३० जुलै २०२१ रोजी सुरू झाली आहे. राज्यभरात सध्या कोठे पाऊस सुरू आहे, मोठ्या पावसामुळे काही दुर्घटना घडली आहे का, याची माहिती या वेबसाइटद्वारे नागरिक आणि प्रशासनाला नेमक्या स्थानासह नकाशावर पाहता येईल.

Continue reading

साध्या फोनवर मोफत ऐका दिवाळी अंक; ‘छात्र प्रबोधन’चा मुलांसाठी अनोखा उपक्रम

पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या ‘छात्र प्रबोधन’ या कुमारांसाठीच्या मासिकाने यंदा दिवाळी अंक फोनवर मोफत ऐकण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. यासाठी स्मार्टफोन लागणार नाही आणि इंटरनेटचीही गरज नाही. फक्त साधा फोन, रेंज आणि ऐकण्याचा उत्साह यांची आवश्यकता आहे.

Continue reading

‘टॉयमॅन’ अरविंद गुप्तांनी घडवली खेळण्यांच्या दुनियेची सफर; वैज्ञानिक खेळणी डिझायनिंगच्या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन

मुलांमधील या कलात्मकतेला आणि कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी पुण्यातील भारतीय विद्या भवन संचलित मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या वतीने ‘खेल खेल में’ ही राष्ट्रीय पातळीवरील टॉय अँड गेम डिझाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ऑनलाइन आहे.

Continue reading

मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे मुलांसाठी विज्ञान खेळणी, गेम डिझायनिंगची राष्ट्रीय स्पर्धा

मुलांमधील या कलात्मकतेला आणि कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी पुण्यातील भारतीय विद्या भवन संचलित मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या वतीने ‘खेल खेल में’ ही राष्ट्रीय पातळीवरील टॉय अँड गेम डिझाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ऑनलाइन आहे.

Continue reading

1 2