कोकणच्या पारंपरिक आदिवासी ठाकर लोककलेला पद्मश्री

कुडाळ : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये आदिवासी ठाकर समाजाच्या लोककलेची पन्नास वर्षे जोपासना करणारे पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील परशुराम विश्राम गंगावणे (वय ६५) यांचा समावेश आहे.