अलोरे (ता. चिपळूण) : येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ २६ ते ३० डिसेंबर २०२२ दरम्यान होत आहे. महोत्सवाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि. २६) सायंकाळी ६ वाजता शाळेच्या माजी विद्यार्थिनी पुण्यातील दीपाली इनामदार-देशपांडे (संगीत अलंकार) यांची शास्त्रीय गायन ‘संध्या’ रंगणार आहे.