मराठी शब्दाला जागणारा माणूस

शब्द ही भाषेची रत्ने. मराठी भाषेतील ही रत्ने निरखून पारखून त्याचे मोल जाणून ती सरस्वतीच्या खजिन्यात सुबकतेने मांडण्याचे काम एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केले. जेम्स थॉमस मोल्सवर्थ हे त्याचे नाव. मराठी भाषेचा पहिला शब्दकोशकर्ता. आज १३ जुलै, जेम्स यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्याच्याविषयी.