नेपाळमध्ये मोठा पूर; रत्नागिरीतील पर्यटक अडकले असल्यास माहिती देण्याचे आवाहन

नेपाळमध्ये मोठा पूर; रत्नागिरीतील पर्यटक अडकले असल्यास माहिती देण्याचे आवाहन

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोसी नदीला आलेल्या भयानक पुरामुळे
जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक किंवा
पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील, तर नातेवाईकांनी माहिती देण्याचे आवाहन
करण्यात आले आहे.

पाण्याखाली गेलेल्या चांदेराईतल्या ७७ दुकानांना प्रत्येकी ५० हजारांची मदत पालकमंत्र्यांकडून जाहीर

काजळी नदीचे पाणी वाढल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई बाजारपेठ दोन दिवस पाण्याखाली होती. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी (२९ जुलै) चांदेराईला भेट दिली आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. तिथल्या ७७ दुकानदारांना प्रत्येकी ५० हजार रुपये, तर टपरीधारकांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी सुरूच; नद्यांना पूर; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या ४० तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जवळपास सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी वाहतूक थांबविण्यात आली आहे.