बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मालवणमध्ये राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

कोकणातील द्रष्टे नेते आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व बॅ. नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष २५ सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाले आहे. त्यांच्या अनेक गुणांपैकी एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचे अभ्यासू वक्तृत्व. म्हणूनच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने मालवणच्या बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे ‘बॅ. नाथ पै करंडक २०२२’ ही राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.