मालवण : कोकणातील द्रष्टे नेते आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व बॅ. नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष २५ सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाले आहे. त्यांच्या अनेक गुणांपैकी एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचे अभ्यासू वक्तृत्व. म्हणूनच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने मालवणच्या बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे ‘बॅ. नाथ पै करंडक २०२२’ ही राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे. मालवणच्या बॅ. नाथ पै सेवांगणातच शुक्रवार, दि. १५ एप्रिल २०२२ रोजी ही स्पर्धा होणार असल्याचे कळवण्यात आले आहे. स्पर्धेच्या विजेत्यांना मोठ्या रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत.
या स्पर्धेसाठी खालील विषय देण्यात आले आहेत.
१. आधुनिक भारताचे एक शिल्पकार – बॅ. नाथ पै
२. लोकशाही भंगारात निघू नये म्हणून…
३. खरा धर्म, धर्माच्या पलीकडचा
४. तोच खरा ‘वक्ता दशसहस्रेषु’!
५. ट्रोल होणं मानवी आहे, ट्रोल करणं नाही
बक्षिसे
पहिल्या पाच क्रमांकांना अनुक्रमे ₹ १५,०००, ₹ १३,०००, ₹ ११,०००, ₹ १०,००० आणि ₹ ७,००० अशा रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच प्रत्येकी ₹ २००० ची पाच उत्तेजनार्थ पारितोषिकेही दिली जाणार आहेत. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
स्पर्धेचे नियम
या स्पर्धेचे काही नियमही जाहीर करण्यात आले आहेत. प्रत्येक स्पर्धकाला सादरीकरणासाठी ५+१=६ मिनिटे वेळ दिला जाणार आहे. भाषण मराठीतच करायचे असून, स्पर्धकाचे वय १६ ते ३० वर्षं या वयोगटातील असावे. स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाला ₹ ५० प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. प्रवेश नोंदविणाऱ्या पहिल्या ४० स्पर्धकांनाच स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे. स्पर्धेसाठी अगोदरच्या दिवशी येणाऱ्या स्पर्धकांची निवास व्यवस्था संयोजकांच्या वतीने करण्यात येईल. स्पर्धेच्या दिवशी सकाळी नाश्ता, दोन वेळचा चहा आणि दोन वेळचं जेवणही दिले जाईल. कोणत्याही क्रमांकाचे पारितोषिक विभागून दिले जाणार नाही, असेही संयोजकांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल. तसेच, स्पर्धेच्या नियमांत ऐन वेळी बदल करण्याचा हक्क संयोजकांकडे राखीव आहे, असेही संयोजकांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क : 8446695434, 9657073333

-
साप्ताहिक कोकण मीडिया – २५ फेब्रुवारी २०२२ चा अंक₹ 10.00
-
सिंधुसाहित्यसरिता₹ 200.00
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड