बॅ. नाथ पै जन्मशताब्दी : खासदार राऊतांकडून सिंधुदुर्गातील १३० वाचनालयांना ‘सिंधुसाहित्यसरिता’ची भेट

बॅ. नाथ पै यांची जन्मशताब्दी नुकतीच २५ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू झाली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, सिंधुसाहित्यसरिता हे पुस्तक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व १३० वाचनालयांना भेट पाठवण्याचा निर्णय खासदार विनायक राऊत यांनी घेतला आहे.

Continue reading

बॅ. नाथ पै : ओजस्वी वक्तृत्वाचे तेजस्वी दर्शन!

बॅ. नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष २५ सप्टेंबर २०२१ पासून सुरू होत आहे. कोकणी जनतेने आपल्या ह्या लाडक्या नेत्याला अनेक बिरुदांच्या आभूषणांनी भूषविले. अगदी ‘लोकशाहीचा कैवारी’पासून ‘अनाथांचा नाथ’पर्यंत एक ना अनेक; पण त्या सर्वांत ‘वक्ता दशसहस्रेषु’ हे आभूषण नाथ पैंना जिरेटोपासारखे शोभून दिसायचे. बालपणी बॅ. नाथ पै यांची अनेक रसाळ भाषणे ऐकण्याची सुवर्णसंधी ज्यांना प्राप्त झाली, ते आचरा (मालवण) येथील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी नाथ पै यांच्या अमोघ वक्तृत्वाबद्दल लिहिलेला सिंधुसाहित्यसरिता पुस्तकातील लेख येथे प्रसिद्ध करत आहोत. तसेच नाथ पै यांची दशावतारी नाटकातील कलाकारांसंदर्भातील एक हृद्य आठवण ही लेखाच्या शेवटी दिलेल्या व्हिडिओत सांगितलेली आहे.

Continue reading

जाणिवेचा अनोखा सरित्सागर संगम

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने प्रसिद्ध केलेल्या आणि रत्नागिरीतील सत्त्वश्री प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ या पुस्तकाची गझलभूषण मधुसूदन नानिवडेकर यांनी लिहिलेली प्रस्तावना.

Continue reading

नानिवडेकर, हरकत होतीच पण ऐकला नाहीत!

गझलभूषण मधुसूदन नानिवडेकर यांचे ११ जुलै २०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी जागविलेल्या आठवणी.

Continue reading

अ. भा. गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन

तळेरे (ता. कणकवली) : अखिल भारतीय गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध गझलकार आणि पत्रकार मधुसूदन नानिवडेकर (वय ६१) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनाने राज्यातील साहित्यिक वर्तुळात तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.

Continue reading

कुशेवाडा ग्रामपंचायतीला पंधरा लाखाचे स्वच्छता बक्षीस प्रदान

सिंधुदुर्गनगरी : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या कुशेवाडा (ता. वेंगुर्ले) ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना पंधरा लाखाचे बक्षीस प्रदान करण्यात आले.

Continue reading

1 2 3 4