रत्नागिरी : रत्नागिरी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुहास वामन तथा कुमार शेट्ये (७० वर्षे) यांचे आज (२७ डिसेंबर) दुपारी रत्नागिरीतील लोटलीकर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला.