वादळानंतर अद्यापही सरकारकडून कोकणाला पुरेशी मदत नाही : फडणवीस यांची टीका

रत्नागिरी : ‘कोकणातील चक्रीवादळानंतरची परिस्थिती पाहून शासनाने मदत केल्याचे दिसत नाही. शासनाचे अस्तित्वच दिसत नाही,’ अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांनी आज (१२ जून) रत्नागिरी जिल्ह्यातील चक्रीवादळाने नुकसान झालेल्या दापोली आणि मंडणगड तालुक्यांचा दौरा केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

महामानवाच्या स्मारकाने दिला अनेकांना आधार

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला. त्यात मंडणगड आणि दापोली या दोन तालुक्यांचा समावेश आहे. घराची छपरे उडून जात असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाने गावातील अनेक कुटुंबांना आधार दिला.