खल्वायनच्या मासिक संगीत सभेत मनोज मेस्त्रींच्या भारदस्त गायनाने रंगत

रत्नागिरी : खल्वायन, रत्नागिरी या संस्थेची २८१ वी मासिक संगीत सभा सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात पार पडली. कणकवलीचे प्रसिद्ध गायक मनोज भालचंद्र मेस्त्री यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग, नाट्यगीत गायनाने ही सभा रंगतदार झाली.