काताळे बंदरातील महाकाय जहाजावर ज्येष्ठ नागरिकांची सफर

रत्नागिरी : वाहतूक सुरक्षिततेकरिता आवश्यक त्या प्रबोधनाच्या कार्यात ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘मोटार जगत’चे संपादक आणि वाहतूक क्षेत्राचे अभ्यासक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केले.

रत्नागिरीतील पर्यावरण संस्थेच्या निबंध स्पर्धेत स्वरा, वर्धन, पूर्वा विजयी

रत्नागिरी : येथील पर्यावरण संस्था आयोजित निबंध स्पर्धेत महाविद्यालय गटातून स्वरा अरुण मुळ्ये प्रथम, माध्यमिक शाळा गटात वर्धन प्रकाश ओळकर आणि चित्रकला स्पर्धेत माध्यमिक गटातून पूर्वा अशोक कोलगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

निसर्गाचे संरक्षणाची सवय स्वतःपासूनच लावावी – आनंद सावंत

अलोरे (ता. चिपळूण) : माणूस राहू शकेल, असा पृथ्वी हा एकमेव ग्रह असून त्यावरील निसर्गाचे संरक्षण करण्याची सवय स्वतःपासूनच लावली पाहिजे, असा सल्ला बंगळूर येथील अभियंता आनंद सावंत यांनी दिला.

सागरी क्षेत्राकडे कोकणातील तरुणांनी वळावे – मरीनर दिलीप भाटकर

अलोरे (ता. चिपळूण) : कोकणातील मुलांनी अथांग समुद्राकडे वळावे आणि रोजगाराच्या संधी म्हणून त्याकडे पाहावे, असे आवाहन मरीनर दिलीप भाटकर यांनी केले.

अलोरे हायस्कूलच्या कार्यक्रमात बुधवारी मरिनर दिलीप भाटकर

अलोरे (ता. चिपळूण) : येथील आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए लाड कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. २८ डिसेंबर) सकाळी १० ते १ या वेळेत मरिनर दिलीप भाटकर उपस्थित राहणार आहेत.

रत्नागिरीत बाया कर्वे कौशल्य विकास केंद्राच्या नवीन बॅचचे उद्घाटन

रत्नागिरी : शिरगाव (रत्नागिरी) येथील *महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे कौशल्य विकास केंद्राच्या नवीन अभ्यासक्रमांच्या पहिल्या बॅचच्या उद्घाटन झाले.