पर्यटनात करिअर : इच्छुक महिला-मुलींसाठी रत्नागिरीत प्रथमच मोफत सेमिनार

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे मारुती मंदिर येथील एस. बी. नलावडे कमर्शिअल सेंटर येथील वास्तूत स्थलांतर होणार आहे. यानिमित्त येत्या १० मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याच वेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वुमेन्स फेस्ट कार्यक्रम होणार आहे.

खऱ्या स्त्री-पुरुष समानतेसाठी महिलांना विचारांचे आणि निर्णयाचे स्वातंत्र्य मिळणे गरजेचे : उमा प्रभू

‘महिलांना आकाशात भरारी मारायची असेल, तर पंखांची गरज नाही. शिक्षणातून मिळणाऱ्या तेजाने त्या कुठेही जाऊ शकतात. समाजात स्त्री-पुरुष समानता खऱ्या अर्थाने यायला हवी असेल, तर केवळ प्रतीकात्मकता नको. महिलांना मनाचे, विचारांचे आणि निर्णयाचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे,’ असे प्रतिपादन मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा आणि इफ्को-टोकियोच्या संचालिका उमा सुरेश प्रभू यांनी १० मार्च रोजी संध्याकाळी रत्नागिरीत केले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेने महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या वूमन्स फेस्ट या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये १० मार्चला वुमेन्स फेस्ट

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे मारुती मंदिर येथील एस. बी. नलावडे कमर्शिअल सेंटर येथील वास्तूत स्थलांतर होणार आहे. यानिमित्त येत्या १० मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याच वेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वुमेन्स फेस्ट कार्यक्रम होणार आहे.

रत्नागिरीच्या महिला बचत गटांचा आवाज जी-20 परिषदेत

रत्नागिरी : येथील महिला बचत गटांचा आवाज तीनचतुर्थांश जग व्यापणाऱ्या जी-20 परिषदेपर्यंत पोहोचला. आपल्या समस्या, मागण्या आणि भविष्यातील योजनाही महिलांनी एका परिषदेमार्फत जगाच्या व्यासपीठावर पोहोचविल्या.

रत्नागिरीत १५ जुलै रोजी जी-20 ची डब्ल्यू-20 परिषद

रत्नागिरी : शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत डब्ल्यू- २० अंतर्गत महिलांसाठी प्रशिक्षण, चर्चासत्र होणार आहे. येत्या १५ जुलैला संस्थेच्या कडवाडकर संकुलात हा कार्यक्रम होणार आहे.