रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उद्योगिनी व महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाची सांगता बक्षीस वितरणाने आठ मार्च रोजी झाली. या वेळी संयोजिका प्राची शिंदे यांनी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, मत्स्य महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. स्वप्नजा मोहिते आणि पावसच्या आनंदी वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रगती खातू यांचा सन्मान केला.

रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे महिला बचतगटांच्या वस्तूंचे प्रदर्शन सुरू; आठ मार्चपर्यंत खुले

रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे उद्योगिनी, महिला बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन रत्नागिरीत साई मंगल कार्यालयात भरवण्यात आले असून, ते आठ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.