मालवणी संस्कृतिसंवर्धनाचा प्रयोग

विविध बोलीभाषा हेही मराठीचे महत्त्वाचे स्रोत आहेत. या भाषा संवर्धित झाल्या, तरच प्रमाण मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकवून ठेवायला मदत होणार आहे. या दृष्टीने बोलीभाषांचे संवर्धनही अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी त्या त्या बोलीभाषामधील कार्यकर्ते दीर्घ काळापासून कार्यरत आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या प्रयत्नांना आणखी बळ प्राप्त झाले आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा या साहित्यभूमीमध्ये झालेल्या मालवणी साहित्य संमेलनाकडे पाहायला हवे.

उषा परब यांच्या मालवणी साहित्यात विविधता : गोव्यातील परिसंवादातील मत

पणजी : मराठी साहित्यात क्वचितच दिसणारी मालवणी भाषा उषा परब यांच्या नाटकातून जाणवते. मालवणी भाषेत मोजकेच लेखक लेखन करतात. मालवणी भाषेतील साहित्य विपुल प्रमाणात प्रसिद्ध व्हायला हवे, असे प्रतिपादन नारायण महाले यांनी केले.