आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महाराष्ट्रभूषण शिल्पकार राम सुतार कालवश!

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे आज (१८ डिसेंबर २०२५) नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या जगातील सर्वांत उंच पुतळ्यासह अनेक महापुरुषांचे पुतळे त्यांनी साकारले होते.

‘वस्त्रहरण’कार कालवश! गंगाराम गवाणकर यांचे निधन

मालवणी भाषा ज्यांच्या ‘वस्त्रहरण’ या नाटकामुळे सातासमुद्रापार गेली, ते ख्यातनाम नाटककार गंगाराम गवाणकर यांचे २७ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.